Nagpur Murder: पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीने मित्राचीच केली हत्या; नागपूर येथील धक्कादायक घटना
ही घटना नागपूरच्या (Nagpur) जरीपटका (Jaripatka) परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांना माहिती पुरवित असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्याचा मित्राची हत्या (Murder) केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूरच्या (Nagpur) जरीपटका (Jaripatka) परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निलोत्पल आणि जरीपटका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
राजा मेथवानी (वय, 34 ) याला अवैद्य दारू विकायचा. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. ज्यामुळे तो कारागृहात गेला होता. दरम्यान, कोणीच त्याची जामीन न दिल्याने त्याला 2 महिने कारागृहातच राहावे लागले होते. त्यानंतर 30 मार्चला तो कारागृहातून बाहेर आला. तसेच जितू उर्फ लाँड्री गगरानी यानेच आपण अवैद्य दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे, असा संशय त्याला होता. यामुळे राजाने जितूचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राजा आणि त्याचा एक मित्र शुक्रवारी सायंकाळी जितूच्या घराजवळ आला. यावेळी फोनद्वारे त्यांनी जितूला बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी जितूला शेजारच्या गल्लीत घेऊन गेले आणि त्याची हत्या केली, अशी माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा- Sardhana Gang Rape Case: शाळेतून परतणाऱ्या मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार, पीडितेची आत्महत्या; Sardhana येथील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जितू गंभीर जखमी झाला. ज्यामुळे रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. तसेच हत्या केल्यानंतर राजा फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजाच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.