नागपूर: कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना आता बसेल फटका; जिल्हाधिकाऱ्यांकडून सायबर सेलला कारवाई करण्याचे निर्देश

तसेच या व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत 4 लोकांना आपला जीव गमावला आहे. तर, 80 हजारांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे

Coronavirus (Photo Credits- IANS)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. तसेच या व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत 4 लोकांना आपला जीव गमावला आहे. तर, 80 हजारांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच सोशल मीडियावर (Social Media) कोरोना संबंधित चुकीचे (Fake News) मॅसेज आणि व्हिडिओच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना आता मोठा फटका बसणार आहे. कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश नागपूरचे (Nagpur) जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे (Ravindra Thackeray) यांनी सायबर सेलला दिले आहे. कोरोनाबाबत प्रशासनातर्फे सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. तसेच नागरिकांनी घाबरु नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भारतातही कोरोनाच्या रुग्णात झपाट्यान वाढ होऊ लागली आहे. मात्र, सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घाबरले आहे. गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मुलीलाही कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. याशिवाय अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई करण्यास सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. सध्या तरी शाळेला सुट्टी देण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- मुंबई: Coronavirus च्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर Fake Biotol हॅन्ड सॅनिटायझर विकणार्‍या व्यक्तीला कांदिवली मध्ये अटक; FDA ची कारवाई

मुंबईच्या कस्तुरबा रूग्णलयामध्ये सध्या कोरोना व्हायरसचे निदान करण्यासाठी लॅब असून तेथेच 2 रूग्नांवर उपचार असून काल रात्री ठाण्यामध्ये एका रूग्णाला कोरोनाचे निदान झाले आहे. सध्या महाराष्ट्रात 14 कोरोनाग्रस्त असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वृद्धाची स्थिती चिंताजनक असून बाकी रूग्ण स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जगभरात आतापर्यंत सुमारे 1,21,500 हजार नागरिकांना कोरोना व्हायरस बाधा झाल्याचा आकडा समोर आला आहे. जगभरात 4,300 नागरिकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच तब्बल 3,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. जगभरातील 144 देशांमध्ये कोरोना व्हायरस प्रादूर्भाव आहे. या विषाणूचे मुल्यांकन करताना जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस म्हणजे एक साथीचा आजार असल्याचे म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif