नागपूर: सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर दांपत्याविरूद्ध बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नागपूर (Nagpur) येथील नागरी रुग्णालयात (Civic Hospital) वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर दांपत्याविरूद्ध बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नागपूर (Nagpur) येथील नागरी रुग्णालयात (Civic Hospital) वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर दांपत्याविरूद्ध बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) कारवाईत संबंधित दाम्पत्यांकडे 2.52 कोटीची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. डॉ. प्रवीण मधुकर गंतावार आणि त्यांची पत्नी डॉ. शीलू गंतावार असे या दाम्पत्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात 2014 साली अँटी- ग्राफ्ट एजन्सीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार या कारवाईला सुरुवात झाली होती.

डॉ. प्रवीण मधुकर गंतावार आणि त्यांची पत्नी डॉ. शीलू गंतावार हे दाम्पत्य 2007 पासून ते नागपूर महानगरपालिका (एनएमसी) द्वारा संचालित इंदिरा गांधी रुग्णालयात कार्यरत आहेत. मात्र, या दाम्पत्याविरूद्ध त्यांच्या उत्पन्नापेक्षा 43 टक्के अधिक संपत्ती असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात सीताबुल्डी पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 1 (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- नालासोपारा: मित्राच्या भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर तलवारीने हल्ला; एकास अटक

पीटीआयचे ट्विट-

तसेच या दाम्पत्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या नावाने नोंदविण्यात आलेली निवासस्थाने, कार्यालये आणि खासगी आस्थापनांमध्ये शोध घेण्यात आला आहे. त्यावेळी हे दांपत्य धंतोली भागात खाजगी रुग्णालय चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.