Nagpur District Central Co-op Bank Scam: काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याशी संबंधीत कथीत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके घोटाळा प्रकरणाचा आज निकाल

1999 साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. त्यावेळी बँकेत असलेली रक्कम एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कोलकाताममधल्या कपनीच्या शेअर्समध्ये गुणतवणूक करण्यात आली होती. मात्र सहकार विभागाचा कायदानुसार बँकेचे परवागी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही.

Nagpur District Central Co-op Bank Scam: काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याशी संबंधीत कथीत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके घोटाळा प्रकरणाचा आज निकाल

नागपूर जिल्हा बँक  (Nagpur District Central Co-op Bank Ltd. Nagpur) घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज  लागणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. काँग्रेस नेते (Congress) आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) हे या प्रकरणात मु्ख्य आरोपी आहे. घोटाळा झाला त्यावेळी  केदार बँकेचे अध्यक्ष होते.  पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. यानंतर केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. (हेही वाचा - Mother's Murder For Tasty Food: रुचकर जेवण दिले नाही म्हणून संताप, ठाणे येथील तरुणाकडून आईची हत्या)

2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा।मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले होते.  मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते.

1999 साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. त्यावेळी बँकेत असलेली रक्कम एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कोलकाताममधल्या कपनीच्या शेअर्समध्ये गुणतवणूक करण्यात आली होती. मात्र सहकार विभागाचा कायदानुसार बँकेचे परवागी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती. खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे बँकत ठेवलेले शेतकऱ्याचे बँकेत ठेवलेले पैसेही बुडाले होते.

(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2023 11:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).