Nagpur Crime: फळविक्रेत्याची चाकू भोसकून हत्या; नागपूरमधील खळबळजनक घटना

योगेश उमरे हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. यासोबतच तो बस स्थानक परिसरातील चालणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत कमिशनवर कामही करत होता.

हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नागपूरमध्ये (Nagpur Crime) एक धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. नागपूरात शहरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात एका फळ विक्रेत्याचा चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून (Nagpur Police) आरोपीचा शोध सुरू आहे. योगेश उमरे असं मृत फळ विक्रेत्याचं नाव आहे. चेतन बगमारे, चेतन पाटील आणि अन्य साथीदारांनी मिळून योगेशवर हल्ला केल्याचा आरोप करण्याता आलाय. (हेही वाचा - Nagpur Crime News: भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, नागपूर येथील घटना)

योगेश उमरे हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. यासोबतच तो बस स्थानक परिसरातील चालणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत कमिशनवर कामही करत होता. गणेशपेठ बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स व्यवसायिकांचे व्यवसाय आहेत. या ठिकाणी योगश हा प्रवाशांना आपल्याकडे वळवण्याचे काम करत होता. यावरून त्याच्यात आणि आरोपींमध्ये वाद झाला. याच वादातून त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या प्रकरणी नागपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींविरोधात गुन्हा हा दाखल करुन घेतला असून त्यांचा शोध हा सुरु केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement