Nagpur Crime News : नागपूरमध्ये बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपींना अटक

कारण बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळ्या नागपूरमध्ये सक्रीय झाल्या आहेत. अशाच एका पैसे घेऊन लग्न लावून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Photo Credit -Pixabay

Nagpur Crime News : पैसे घेऊन लग्न लावून देणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिस (Nagpur Police)नी पर्दाफाश केला आहे. ही टोळी वराकडून 50 हजार रुपये घ्यायची. त्यानंतर या टोळीमधील एका मुलीला वधू (Bride )बनवण्यात येत होते. ही वधू लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी वराच्या घरून पळून जायची. याप्रकरणी तक्रार दाखल होताच ग्रामीण पोलिसांनी(Rural Police) सापळा रचून चार आरोपींना अटक केली आहे. (हेही वाचा : Thane Crime : अनैसर्गिक शरीरसंबंधांना नकार, दोन भावांकडून 12 वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या)

नागपूरमधील मौदा तालुक्यातील वाळकेश्वर गावातील मनोहर मेश्राम यांच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले होते. त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. वधूने मेश्राम यांचा मुलगा प्रवीण याच्याशी २ फेब्रुवारी रोजी लग्न केले होते. त्याबदल्यात, मेश्राम कुटुंबीयांकडून त्यांनी ५० हजार रुपये घेतले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू बेपत्ता झाली. मेश्राम कुटुंबीयांनी वधूची आई सीमा यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून फोन उचलण्यात आला नाही. यानंतर मेश्राम कुटुंबाला फसवणूक झाल्याचा संशय आला. यानंतर चौकशी केली असता त्यांनी इतर लोकांचीही फसवणूक केल्याची माहिती समोर आली.(हेही वाचा : Pune Crime: कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर, पुण्यातील घटना)

त्यानंतर मेश्राम कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली. या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी सीमा यांनी एक कुटुंब लग्नासाठी वधूच्या शोधात असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात हे आरोपी अडकले. पोलिसांनी वधू सोनूसह सीमा आणि अन्य दोन साथीदारांना अटक केली आहे.