Thane Crime : अनैसर्गिक शरीरसंबंधांना नकार, दोन भावांकडून 12 वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या
Crime (PC- File Image)

Thane Crime : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे ठाण्यातील एका घटनेतून समोर आले आहे. तळोजा परिसरामध्ये शरीरसंबंधांना नकार दिल्याने एका अल्पवयीन (Minor) दिव्यांग मुलाची निघ्रृणपणे हत्या (Murder)करण्यात आली आहे. ठाणे शहर पोलिसांनी शनिवारी रात्री या गुन्ह्यात 2 भावांना अटक केली आहे. रमझान शेख आणि मोहम्मद शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. रमझान हा 20 वर्षांचा असून मोहम्मद 30 वर्षांचा आहे. डायघर येथील ठाकुरपाडा भागात राहणाऱ्या या दोन्ही भावांनी त्यांच्या शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलाची हत्या केली. (हेही वाचा :Pune Crime: कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर, पुण्यातील घटना )

रमझानने शेजारच्या घरात राहणाऱ्या या 12 वर्षीय मुलाला अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने निर्जनस्थळी नेले होते. त्यानंतर घाणेरडे चाळे करण्यास सुरूवात केली. मात्र, आपल्याबरोबर काहीतरी वाईट कृत्य करण्यात येत असल्याचं त्या मुलाच्या लक्षात येताच मुलाने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यावर रमझान संतापला त्याने मुलाला मारहाण केली. त्याला सोडून दिल्यास या गोष्टीची तो कुठेतरी वाच्यता करेल याची भिती वाटल्याने रमझानने त्याच्या डोक्यात दगड घालून मुलाला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलाचा गळाही दाबला. मात्र तो मेला की नाही हे कळू न शकल्याने रमझानने त्याच्या भावाला म्हणजेच मोहम्मदला बोलावले. त्यानंतर दोघांनी मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाच लावण्यासाठी त्याचे हातपाय बांधले आणि त्याला जवळच असलेल्या पाण्याच्या डबक्यात फेकून दिले. (हेही वाचा :Thane Crime: ठाण्यमध्ये गुन्ह्यांची मालिगा, ज्वेलर्समधून सोन्याचे 1.5 कोटी रुपयांचे दागीने गायब, रोखड लंपास, जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल )

दरम्यान, मुलगा बराच वेळ घरी न आल्याने मुलाच्या आईने मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार डायघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. डायघर पोलिसांनी या मुलाचा शोध सुरु केला मात्र त्यांना यात सुरुवातीला यश आलं नाही. त्यानंतर तळोजा पोलिसांना डायघर पोलिसांनी शरीरयष्टीचा लहान मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ८ जणाची चौकशी केली. त्यात दोघे आरोपीही होते. या दरम्यान, दोन्ही भावांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. त्यामुळेच पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूला दिली.