नागपूर आणि गोंदिया येथे सरकारच्या शालेय पोषण आहारात अळ्या-वटवाघळाचे मृत पिल्लू, अंगणवाडीच्या आहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित
मात्र या मिड डे मिलच्या नावाखाली काही वेळेस वेगळेप्रकार सुरु असल्याच्या घटनासुद्धा उघडकीस आल्या आहेत.
शासकीय शाळांमध्ये सरकारने मीड डे मिल (Mid Day Meal) मिळावे म्हणून त्यांना दुपारच्या वेळेस विद्यार्थ्यांना शाळेत जेवण दिले जाते. मात्र या मिड डे मिलच्या नावाखाली काही वेळेस वेगळेप्रकार सुरु असल्याच्या घटनासुद्धा उघडकीस आल्या आहेत. तर बालकांना जेवणासाठी वाढण्यात येणारे अन्नधान्य सुद्धा उत्तम प्रकारचे नसल्याची बाबसुद्धा प्रशासनाला दाखवून देण्यात आली आहे. त्यानंतर आता तर ग्रामीण भागातील नागपूर (Nagpur) आणि गोंदिया (Gondia) मधील सरकारी शाळांमध्ये जे पोषण आहार दिले जाते त्यामध्ये अळ्या-वटवाघळाचे मृत पिल्लू आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे आता शाळेतील बालकांना पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहारावर विवध प्रश्न उपस्थित केले जात आहे.
गोंदिया मधील पोषण आहारात पुरवल्या जाणाऱ्या मसूर डाळीच्या पाकिटात वटवाघळाचे मृत पिल्लू आढळून आले आहे. तर शाळेतील बालकांना पोषण आहारासाठी अन्नधान्य दिले जाते. मायरा नावाच्या मुलीला देण्यात आलेल्या डाळीच्या पाकिटात हे मृत पिल्लू सापडल्याने अंगणवाडीच्या आहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.(भयंकर! शाळेच्या Midday Meal मध्ये आढळला साप, पालकांकडून संताप व्यक्त)
तर नागपूर येथील भातात अळ्या सापडल्या असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील हा प्रकार आहे. या शाळेतील बालकांना बचत गटाकडून आहाराचा पुरवठा केला जातो. परंतु भातात अळ्या सापडल्याने बालकांनी अशा निकृष्ट पद्धतीचे जेवण खाल्ल्यास त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणांची लवकरच चौकशी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वीसुद्धा नांदेड मधील जिल्हा परिशदेच्या एका शाळेतील जेवणात मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत साप शिजवला गेल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला होता.