Nagpur Accident: धक्कादायक, बिडगावात टिप्परची सायकलला धडक, दोघांचा मृत्यू, संतप्त जमावाकडून ट्रकची जाळपोळ
नागपूर शहरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिडगाव चौकात मोठा एक अपघात झाला आहे.
Nagpur Accident: नागपूर शहरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिडगाव चौकात मोठा एक अपघात झाला आहे. या घटनेत टिप्परने सायकलवरून जाणाऱ्या बहिण भावास चिरडले. ही घटना आज सकाळी 9.50 वाजता घडली. घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी टिप्पर जाळत चालकाला बेदम मारहाण केली. यावेळी पोलिस वाहन आणि अग्निशमन वाहनांची तोडफोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- सोलापूरमध्ये भीषण अपघात, शिर्डीला जाणाऱ्या गाडीची कंटेनरला धडक)
मिळालेल्या माहितीनुसार, दोघे बहिण भाऊ सायकल वरून जात असताना मागून भांडेवाडी येथून येणाऱ्या टिप्परने त्यांना धडक दिली. धडक इतक्या जोरात होती की दोघेही या अपघातात जखमी झाले आणि त्यांच्या जागीच मृत्यू झाला. सुमित कन्हैय्यालाल सैनी (वय १५,रा.अंबेनगर, पारडी) आणि अंजली सैनी (वय१८)अशी मृत मुलांची नावे आहेत. ते दोघेही चौकातून जात होते. हा अपघात पाहून स्थानिकांनी घटना स्थळी जमाव केला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
या अपघातामुळे चौकातील स्थानिकांनी उपस्थित वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर काही नागरिकांनी चालकास ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान काही संपातलेल्या नागरिकांनी टिप्परची जाळपोळ सुरुवात केली. एवढेच नव्हे तर संपत्त जमावांनी पोलिस वाहनावर दगडफेक केली. अग्निशमन दलाच्या वाहनाची तोडफोड केली. मृतांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर मृतदेह शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यामुळे पारडी, कळमना, शांतीनगर, तहसील, गणेशपेठ यासह सर्वच ठान्यातील पोलिसांना पाचारण करण्यात आले.
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2023 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

