Solapur Accident: सोलापूरमध्ये भीषण अपघात, शिर्डीला जाणाऱ्या गाडीची कंटेनरला धडक, चौघांचा जागीच मृत्यू
अपघात । फाईल इमेज

आज सोलापूरात एक भीषण अपघात घडला आहे. शिर्डीला (Shirdi) जाणाऱ्या भाविकांववर दुखाचा डोंगर कोसळलाय. करमाळा - नगर मार्गावर (karmala - nagar road) पांडे गावाजवळ आज शिर्डीला निघालेल्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. अपघात होताच, घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसही तात्काळ घटनास्थळावर पोहचले होते. सहा जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटून पडली. गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा - Accident Caught On Camera In Karnataka: कर्नाटक बिदरमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या दोन वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

ही  कार गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जात आहे. पांडे गावाजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला . यामध्ये नवरदेव- नवरी असल्याचेही सांगितले जात आहे. अपघाताचे कारण नेमके समजलेले नसून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.