Nagpur: धक्कादायक! मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून सेक्स करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले; नागपूर येथील घटना
मृत व्यक्ती हा इंजिनीअर असून त्याचे लग्न झाले आहे. मात्र, त्याचे गेल्या दिवसांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु असल्याचे कळत आहे.
मोबाईलवर पॉर्न फिल्म (Porn Videos) पाहून वेगवेगळ्या प्रकारे शारिरिक संबंध प्रस्थापित करण्याचा नादात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या सावनेर (Savner) गावात गुरूवारी घडली आहे. मृत व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर गेला होता. त्यावेळी त्याने तिच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्याचवेळी तरुणाच्या गळ्याला फास लागून त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हा इंजिनीअर असून त्याचे लग्न झाले आहे. मात्र, त्याचे गेल्या काही दिवसांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु असल्याचे कळत आहे. दरम्यान, दोघांनीही गुरुवारी बाहेर फिरायला जाण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव परिसरात असलेल्या महाराजा लॉजवरील एक खोली बुक केली. तिथे गेल्यानंतर पॉर्न फिल्म पाहून तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत वेगवेगळ्या प्रकारे शारिरिक सबंध प्रस्थापित करण्यासाठी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याने हात आणि पाय दोरीने बांधून घेतले आणि दोघांनी शाररिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरूणी बाथरूम मध्ये गेली असताना तरूण खुर्चीसह खाली कोळसला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेली दोरी आवळली गेली. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Thane Shocking: खळबळजनक! ठाणे येथे 19 वर्षीय तरुणावर लैंगिक अत्याचार; चौघांविरोधात गुन्हा दाखल
तरूणासोबत घडलेला संपूर्ण प्रकार विचित्र असून यासंदर्भात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूंची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या संदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2021 07:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

