'माझा फोन टॅप होत असल्याचा दाट संशय'; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

ट्विट करत यांनी याबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Jitendra Awhad (Photo Credit: Twitter)

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपला फोन टॅप (Phone Tap) केला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ट्विट करत यांनी याबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी फोन टॅप होत असल्याचा संशय त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. दरम्यान, यापूर्वी शिवसेना खासदार यांनी फोन टॅप होत असल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

"माझा फोन टॅप होत असल्याचा दाट संशय मला येत आहे. विशेषत: व्हॉट्सअॅप. कोणत्यातरी एन्जसीकडून त्यावर पातळ ठेवली जात आहे," असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (खुशखबर! मुंबई आणि ठाण्यात परवडणा-या किंमतीत घरं घेण्याचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण; जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या घरांबाबत केली 'ही' मोठी घोषणा)

जितेंद्र आव्हाड ट्विट:

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्वी निमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील फोन टॅपिंगवर भाष्य करताना म्हटले की, "सहकारी म्हणायचे आणि फोन टॅप करायचे, असे मी करत नाही."

काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. "आधीच्या सरकारी धोरणांचा बाऊ करत यांनी स्वत: महागाईचा भस्मासूर उभा केल्याचे," ते म्हणाले होते.