Maharashtra Bandh on October 11: लखीमपूर खेरी हिंसाचार निषेधार्थ महाविकास आघाडीची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, जनतेला पाठिंबा देण्याचे केले आवाहन
या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या (11 ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
Maharashtra Bandh on October 11: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या (11 ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. तसेच जनतेने या राज्यव्यापी बंदला स्वत:हून पाठिंबा देण्याचे व यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महत्वाचे म्हणजे, या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तर, 12 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत बंद सुरु राहणार आहे. आज मध्यरात्रीपासून या बंदला सुरुवात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
लखीमपूर खेरी येथे ज्या शेतकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, त्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज रात्री 12 वाजेनंतर बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते लोका्ंना भेटून उद्या बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती करणार आहेत. हा बंद केंद्रातील जुलमी सरकार जे शेतकरी विरोधी आहे. शेत मालाची लुटीसाठी कायदे करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांच्या हत्या करत आहेत, या घटनांच्या विरोधात आहे.” असे मलिक यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Bandh: उद्या राज्यव्यापी बंद साठी मुंबई पोलिस सज्ज; SRPF च्या जवानांसह अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त
नवाब मलिक यांचे ट्वीट-
या हत्यांमागे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा हात असल्याचे जनतेने दाखवून दिले. मात्र, अद्यापही कोणती कारवाई झाली नाही. ही घटना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या घडली आहे. यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.