Sangli: लग्नाला नकार दिला म्हणून पोटच्या मुलीची निघृण हत्या; पित्याला अटक
लग्नाला नकार दिला म्हणून पोटच्या मुलीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सांगली (Sangli) जिल्ह्यात आज घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पित्याला अटक केली आहे.
लग्नाला नकार दिला म्हणून पोटच्या मुलीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सांगली (Sangli) जिल्ह्यात आज घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. संबंधित मुलीला सैन्यात नोकरीला असणाऱ्या एका मुलाचे स्थळ आले होते. परंतु, मुलगा दिसयला चांगला नाही, म्हणून मुलीने लग्नाला नकार दिला. यावर संतापलेल्या पित्याने मुलीची हत्या निघृण हत्या केली. एवढेच नव्हेतर, या हत्यानंतर आरोपीने मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करत तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. मात्र, यासंदर्भात पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पित्याची चौकशी केली. त्यानंतर आपणच मुलीची हत्या केल्याचे पित्याने कबूली दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
उत्तम चौगुले असे आरोपीचे नाव आहे. 13 मार्च रोजी उत्तम चौगुले यांच्या घरातील सर्व सदस्य बाहेर गेले होते. यावेळी आरोपी बापाने पुन्हा एकदा मुलीला लग्नासाठी घाट घातला. मात्र, मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर उत्तम यांनी शेतातील गाजरे काढण्याच्या बेडग्याने मुलीला बेदम मारहाण केली. याचदरम्यान, मुलीचा जीव गेला. त्यानंतर सायंकाळी घरातील सर्व सदस्य परतल्यानंतर उत्तम यांनी मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला. याचबरोबर कोणालाही काही कळायच्या आत त्याने पहाटे मुलीचा अंत्यसंस्कार देखील उरकून टाकला, अशी माहिती लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Yavatmal: हृदय हेलावून टाकणारी घटना! यवतमाळच्या मारेगाव येथील एका विहिरीत आढळला माय-लेकीचा मृतदेह
दरम्यान, मुलीचा पहाटे अंत्यसंस्कार उरकून टाकल्याने गावात कुजबूज सुरु झाली. तसेच याप्रकरणी वेगळाच संशय येताच सांगली पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली. पोलीसांनी खाक्या दाखवताच आरोपी वडिल उत्तम चौगुले यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील चौकशीला सुरूवात केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2021 07:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

