Yavatmal: हृदय हेलावून टाकणारी घटना! यवतमाळच्या मारेगाव येथील एका विहिरीत आढळला माय-लेकीचा मृतदेह

यवतमाळच्या (Yavatmal) मारेगाव (Maregaon) येथील एका विहिरीत दीड वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

Yavatmal: हृदय हेलावून टाकणारी घटना! यवतमाळच्या मारेगाव येथील एका विहिरीत आढळला माय-लेकीचा मृतदेह
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

यवतमाळच्या (Yavatmal) मारेगाव (Maregaon) येथील एका विहिरीत दीड वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेच्या निमित्याने काही प्रश्न निर्माण झाले असून सत्त्य काय ते शोधून काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोमल उलमाले (वय, 30) यांचे उमेश यांच्याशी गेल्या 11 वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी 9 वर्षाची धाकटी मुलगी श्रुती ही दीड वर्षाची आहे. कोमल या उमेश यांच्यासह मारेगाव येथील राहत होत्या. तर, वणी हे त्याचे माहेर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोमल आणि उमेश यांनी शुक्रवारी रात्री परिवारासह एकत्र जेवण केले. त्यानंतर त्या आपल्या खोलीत झोपायला गेल्या. त्यानंतर कोमल यांनी श्रुतीला सोबत घराच्या मागच्या दाराने निघून गेल्या. हे लक्षात येताच उमेश आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. मात्र, त्यांना कोमल कुठेच न दिसल्याने त्यांनी सकाळी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, कोमल यांची शोधाशोध सुरु असताना पुरके आश्रमजवळील एका विहिरीच्या काठावर पायातील चप्पल आणि दुधाची बॉटल दिसली. त्यांनंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गळ टाकून शोध घेतला. यावेळी विहिरीत कोमल यांच्यासह श्रुतीचाही मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! हिंगोलीत एका माथेफिरूने आजीसह मावशीची केली कु-हाडीने वार करुन केली हत्या

कोमल यांच्या मृत्युमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच कोमल यांना त्याच्या सासरच्या लोकांचा काही त्रास होता का? याचाही शोध घेतला जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2021 08:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).