Municipal Corporation Election Reservation 2022: राज्यातील 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोड, अनेकांच्या राजकीय वाटचालीचा फैसला

प्रशासकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु आहे. अशातच राज्यातील जवळपास 14 महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण (Municipal Corporation Election Reservation) सोडत आज पार पडणार आहे.

Election Results | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील मरहापालिका निवडणूक (Municipal Corporation Election Reservation) कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु आहे. अशातच राज्यातील जवळपास 14 महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण (Municipal Corporation Election Reservation) सोडत आज (31 मे) पार पडणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार हे आता जवळपास निश्चित झाल्याने राजकीय पक्षही कामाला लागले आहेत. दरम्यन, आज जाहीर होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे स्थानिक पातळीवरील अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची दिशा ठरणार आहे. काहींना संधी मिळणार आहे तर काहींची संधी रोखली जाण्याचीही शक्यता आहे. आज प्रामुख्याने मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कल्याण डोंबिवली, पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि कोल्हापूरच्या (Kolhapur) महापालिकांसह 14 महापालिकांची सोडत जाहीर होत आहे.

आरक्षण सोडत जाहीर होणाऱ्या महापालिका

  1. मुंबई महापालिका
  2. नवी मुंबई महापालिका
  3. वसई विरार महापालिका
  4. उल्हासनगर महापालिका
  5. कोल्हापूर महापालिका
  6. अकोला महापालिका
  7. अमरावती महापालिका
  8. नागपूर महापालिका
  9. सोलापूर महापालिका
  10. नाशिक महापालिका
  11. पुणे महापालिका
  12. पिंपरी चिंचवड महापालिका
  13. कल्याण डोंबिवली महापालिका
  14. ठाणे महापालिका

(हेही वाचा,  BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युती? ठाकरे, पवार यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त)

मुंबईच्या वांदेर येथील रंगशारदा सभागृहात महापालिका निवडणूक आरक्षणाची सोडत पार पडणार आहे. आज कोणत्या प्रभागात आरक्षण पडते यावर अनेकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. आरक्षणाच्या सोडतीकडे उमेदवार, राजकीय पक्ष आणि सामान्य जनता अशा जवळपास सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.