मुंबईकरांनी ‘मिलकर’ संकेतस्थळाच्या माध्यमातून दान अन् काम करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांनी ‘मिलकर’ संकेतस्थळाच्या माध्यमातून दान आणि काम करावे, असं आवाहन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मिलकर संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी एकत्र आलेल्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेसचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज क्राऊड फंडिंग प्रणालीच्या https://milkar.ketto.org/covid19 या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांनी ‘मिलकर’ संकेतस्थळाच्या माध्यमातून दान आणि काम करावे, असं आवाहन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मिलकर संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी एकत्र आलेल्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेसचे अभिनंदन केले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मला कोणी विचार की देव कुठे आहे? तर मी म्हणेन देव मदत करणाऱ्या सर्व हातांमध्ये आहे. सगळे मिळून जेव्हा काम करतात तेव्हा यश मिळतेचं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने आपण कोविड विषाणूविरुद्धचे युद्ध नक्की जिंकू, असा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. (हेही वाचा - महाराष्ट्रात आज 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू तर 5257 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
दरम्यान, 'मिलकर' या व्यासपीठाची स्थापना बृहन्मुंबई महानगरपालिका, कॉर्पोरेट हाऊसेस आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येऊन केली आहे. हे संकेतस्थळ भुकेल्या व्यक्तींना अन्न पुरवण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करील. यासाठी गोदरेज अँण्ड बॉयसी, आरपीजी फाऊंडेशन, एटीई चंद्रा फाऊंडेशन निधी देणार आहेत. मिलकरच्या ऑनलाईन उद्धघाटन कार्यक्रमात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध कॉर्पोरेट हाऊसेसचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मिलकर व्यासपीठाच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत रेशनकिट पोहोचवणे शक्य होणार असल्याचे सांगत मुंबईत कुणीही भुकेले राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
काय आहे मिलकर?
'मिलकर' हा ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना गरजू लोकांशी जोडणारा सेतू आहे. हे सगळे लोक, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थां, कॉर्पोरेट हाऊसेस यांनी एकत्र येऊन भूक निर्मूलनासाठी सुरु केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. मिलकरमध्ये युवा, चाईल्ड राईट्स ॲण्ड यु, चाईल्ड हूड टू लाईव्हहूड, अक्षयपात्र, फ्रॉम यु टू देम, सलाम मुंबई, क्राय यासारख्या स्वंयसेवी संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. मिलकरच्या माध्यमातून जे लोक मदत करू इच्छितात त्यांना ज्या वॉर्डमध्ये मदत करायची आहे तो वॉर्ड निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना या प्रभागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजू व्यक्तीपर्यंत रेशनकिट पोहोचवता येणार आहे.