Mumbai: दिलासादायक! घाटकोपर येथे होणार 15 हजार झोपड्यांचा पुनर्विकास; MMRDA आणि SRA यांच्यात संयुक्त भागीदारी करार

एसआरए आणि एमएमआरडीए यांच्यात याअन्वये माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून करण्यात आहे. या प्रकल्पात पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे २००० झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार आहे.

MMRDA आणि SRA यांच्यात संयुक्त भागीदारी करार

महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत हा करार झाला. यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मान्यता दिली.

दरम्यान, मुंबई महापालिकेप्रमाणेच एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिले.

झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास-

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामांना चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको व म्हाडा यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. एसआरए आणि एमएमआरडीए यांच्यात याअन्वये माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून करण्यात आहे. या प्रकल्पात पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे २००० झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असून त्यामुळे हा रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा संयुक्त करार करण्यात आला.

पॉड टॅक्सी-

वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान वांद्रे–कुर्ला संकुलामधून ‘पॉड टॅक्सी’ धावणार असून त्याची लांबी ८.८० कीमी एवढी आहे. त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल ४० किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे, हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

झोपडपट्टी मुक्त ठाणे-

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा यांच्या मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास व सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. (हेही वाचा: Cataract Surgery Campaign: सर्वसामान्यांना दिलासा! राज्यातील विशेष मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ, जाणून घ्या सविस्तर)

यावेळी बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम (ठाणे कोस्टल रोड), पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते ठाणे पर्यंत विस्तारीकरण प्रकल्प, पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या ८.२५ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे काम, कासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्प, विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (Extened MUIP) ऐरोली बोगदा ते कटाई नाका, गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे काम, कल्याण बाह्यवळण रस्ता भाग ८ च्या (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement