मुंबई: 'पश्चिम रेल्वे'ची अप-डाऊन मार्गावरील वाहतूक कोलमडली; वसई रोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड

पश्चिम रेल्वेवर सध्या रेल्वे दोन्ही दिशेने सुमारे 10-15 मिनिटं उशिरानं धावत आहेत.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) वसई रोड रेल्वे स्थानकाजवळ  (Vasai Road Railway Station) सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. मुंबईकरांच्या ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळेमध्ये हा बिघाड झाल्याने अनेक मुंबईकरांना आज ऑफिसमध्ये लेट मार्क लागण्याची शक्यता आहे. वसई रोड जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक सेवा कोलमडली आहे.

पश्चिम रेल्वेवर सध्या रेल्वे दोन्ही दिशेने सुमारे 10-15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. यामुळे लोकलसोबतच रेल्वे स्थानकांवरही गर्दी झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणेमधील बिघाड दुरूस्त करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मध्य मुंबईत आज सकाळी सायन फ्लायओव्हर नजीकच्या परिसरातही ट्राफिक जाम झाले होते. मात्र सध्या पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याने सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकांवर खुल्या पद्धतीने लिंबू सरबत विकण्यास बंदी, मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय

पश्चिम रेल्वेवर सध्या दरवाज्यात उभं राहणार्‍या प्रवाशांच्या विरोधात खास मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये 24 मार्चपर्यंत हजार प्रवाशांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून 1.47 लाख रूपयांची वसुली करण्यात आली आहे.