Mumbai Western Railway Mega Block: आज रात्रीपासून 11 तास चर्चगेट - दादर दरम्यान रेल्वेसेवा राहणार ठप्प, मुंबईकरांच्या मदतीला धावणार 6 विशेष BEST Buses

2-3 फेब्रुवारीच्या 11तासांच्या मेगा ब्लॉक दरम्यान रात्री 9.30 ते 1.30 आणि पहाटे 3.30 ते 10.00 या वेळात खास BEST बस धावणार आहेत.

BEST Bus ( Photo Credits: commons.wikimedia )

लोअर परेल (Lower Parel ) स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी आज रात्री दहा वाजल्यापासून कामाला सुरुवात होणार आहे. Delisle Road Bridge च्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून सुमारे 11 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ऐरवी रविवारी सकाळी सुरु होणारा मेगाब्लॉक (Mega Block) आज रात्रीपासूनच सुरु होणार असल्याने चर्चगेट -दादर (Churchgate-Dadar)  या स्थानकांदरम्यान रेल्वेसेवा ठप्प राहील. रात्री उशिरा बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होऊ नये याकरिता बेस्टने खास सहा बससेवा (Special BEST Bus) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चर्चगेट ते दादर ट्रेन सुरु नसली तरीही मुंबईकरांना रात्री दीड वाजेपर्यंत बेस्ट बसचा आधार असेल. Mumbai Western Railway Mega Block: आज पश्चिम रेल्वेचा 11 तासांचा मेगाब्लॉक, रात्री 9.44 ला सुटणार शेवटची लोकल

पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉक दरम्यान बेस्ट मुंबईकरांसाठी धावणार

11 तासांच्या पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे चर्चगेट - दादर दरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प असेल. मात्र या काळात बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा सहा विशेष बस धावतील. ही खास बससेवा चर्चगेट ते दादर स्थानका दरम्यान असेल. मरीन लाईन्स, चर्नीरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परेल आणि प्रभादेवी अशा सर्व स्थानकांवर या बससेवेला खास थांबा असेल. शनिवार रात्री 9.30 ते 1.30 आणि पहाटे 3.30 ते 10.00 या वेळात खास बस धावणार आहेत. लोअर परेल स्थानकावर पुढील 12 महिन्यात नवा पूल उभा राहणार,पश्चिम रेल्वेचा फेब्रुवारी महिन्यात जम्बो मेगाब्लॉक, 84 कोटी खर्च

उद्या पश्चिम रेल्वे सोबतच मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरही मेगा ब्लॉक असेल. लोअर परेल स्टेशन जवळील Delisle Bridge ट्राफिकसाठी मागील सहा महिने बंद आहे. लवकरच या ठिकाणी नवा पूल बांधला जाणार आहे.