Mumbai Weather Updates: मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली; किमान तापमान 20.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले

Mumbai Weather AQI Updates: मुंबईचे तापमान 20.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर शहरातील हवेची गुणवत्ता काही भागात 'मध्यम' आणि 'खराब' पातळीपर्यंत खालावली. एक्यूआयची पातळी, हवामानाची अद्ययावत माहिती आणि प्रदूषण नियंत्रण उपायांबद्दल जाणून घ्या.

Mumbai Weather | (Photo Credit- X/ANI)

BMC Pollution Control: मुंबई शहरातील तापमानात सोमवारी (30 डिसेंबर) किंतीच घट झाली तर हवेतीची गुणवत्ता (Mumbai Air Quality) मात्र मोठ्या प्रमाणावर घसरली. खराब एकूआयमुळे शहरात विविध ठिकाणी धुके आणि धूळ पाहायला मिळाली. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, शहरातील किमान तापमान (Mumbai Temperature) सोमवारी 20.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आयएमडीने मुंबईसाठी आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज (Mumbai Weather Updates) वर्तवला असून सकाळी तापमान 18 अंश सेल्सिअस आणि दिवसा 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असे म्हटले आहे. सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान 33.5 अंश सेल्सिअस आणि किमान 20.3 अंश सेल्सिअस नोंदवले, तर कोलाबा वेधशाळेने कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस आणि किमान 21.9 अंश सेल्सिअस नोंदवले.

सकाळची धूळ आणि वाढणारे वायू प्रदूषण

मुंबईचे हवामान पाहता अनेक भागांत धुके पसरल्याने शहरात सकाळी धुळीचे वातावरण निर्माण झाले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एपवर उपलब्ध माहितीनुसार एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 127 वर 'मध्यम' श्रेणीत नोंदवला गेला. (हेही वाचा, Mumbai Air Quality: मुंबईची हवा घातक श्रेणीत, धुरक्याने कोंडला नागरिकांचा श्वास, दृश्यमानताही घटली; घ्या जाणून)

संपूर्ण मुंबई शहरात झालेल्या AQI नोंदी

  • वांद्रे कुर्ला संकुलः 179 (मध्यम)
  • कुलाबाः 113 (मध्यम)
  • देवनार: 114 (मध्यम)
  • कांदिवलीः 113 (मध्यम)
  • शिवडीः 221 (खराब)
  • नवी मुंबई: 105 (मध्यम)
  • ठाणेः 86 (चांगले)

खराब हवेमुळे वाहतूक पोलिसांवर परिणाम

प्रदूषणाच्या वाढत्या पातळीचा शहरातील वाहतूक पोलिसांवर लक्षणीय परिणाम झाला आहे, अनेक अधिकारी प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात आल्यामुळे श्वसनाचे आजार, उच्च रक्तदाब आणि दम्याने ग्रस्त असल्याचे वृत्त आहे.

वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उपाययोजना:

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बांधकाम उपक्रमांमुळे होणारे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी 24 विभागांमध्ये धूळ नियंत्रण यंत्रे आणि पाण्याचे 100 टँकर तैनात केले आहेत.
  • अद्ययावत प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी बांधकाम स्थळांची तपासणी करण्यासाठी प्रभाग स्तरावर पथके स्थापन केली जाणार आहेत.
  • सर्व बांधकाम प्रकल्प कामाच्या ठिकाणी संवेदक-आधारित वायू प्रदूषण देखरेख प्रणाली बसवली जाईल. (हेही वाचा, Mumbai AQI Today: मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक स्थितीत, पाहा शहरातील विविध भागातील हवेची गुणवत्ता)

आयएमडी हवामान अंदाज

आयएमडीने पुढील 24 तासांमध्ये आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवला असून सापेक्ष आर्द्रता 76% असेल. सकाळी 7:11 वाजता सूर्योदय आणि संध्याकाळी 6:11 वाजता सूर्यास्त अपेक्षित आहे.

मुंबई शहरात धुक्याची चादर

खराब हवेच्या गुणवत्तेशी संबंधित आरोग्याची जोखीम कमी करण्यासाठी रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे, विशेषतः बाह्य कृतीदरम्यान. अधिक माहितीसाठी आयएमडी आणि बीएमसी कडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीवर लक्ष ठेवा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now