Mumbai Weather Prediction For Tomorrow: मुंबई मध्ये उद्याचे हवामान कसे असणार? जाणून घ्या पावसाचा अंदाज
हवामान खात्याने उद्या 15 जुलैसाठी मुंबईला यलो अलर्ट दिलेला आहे.
मुंबई (Mumbai) मध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाचं धूमशान सुरू आहे. अधून मधून बरसणार्या अतिमुसळधार धारांमुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळे वाहतूक सेवा रखडल्याचं चित्र आहे. उद्याचे हवामान कसे असा तुम्हांला प्रश्न असेल तर पावसाचा जोर कायम असणार आहे. हवामान खात्याकडून मुंबई आणि आजुबाजूच्या भागाला यलो अलर्ट दिला आहे. म्हणजे अधून मधून पाऊस बरसणार आहे.
यंदा वेळेआधीच मान्सून दाखल पण जोरदार सरी बरसण्याची प्रतिक्षा मागील आठवड्यापर्यंत कायम होती. जुलै महिन्यात मुंबईसह राज्यात सर्वदूर चांगला पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाहेर पडताना वेळोवेळी हवामान खात्याकडून दिले जाणारे संकेत पाहूनच बाहेर पडण्याचा सल्ला कायम आहे.
मुंबई मध्ये उद्याचे हवामान कसे असेल?
हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे