Advertisement

Mumbai Weather: मुसळधार पावसाचा मुंबईत कहर, खराब हवामानाचा हवाई प्रवासावर परिणाम, अनेक उड्डाणे रद्द

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई लोकल गाड्यांना याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे लोकल रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

Mumbai Weather: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई लोकल गाड्यांना याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे लोकल रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. खड्डेमय रस्त्यावर वाहने अडकली आहेत. मुसळधार पावसामुळे हवाई सेवेवरही परिणाम झाला आहे. इंडिगोने X वरील पोस्टमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. एअरलाइन्सने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मुसळधार पावसामुळे मुंबईला ये-जा करणाऱ्या फ्लाइटवर परिणाम झाला आहे. पर्यायी फ्लाइटची निवड करण्यासाठी किंवा पूर्ण परतावा मिळविण्यासाठी, https://bit.ly/3MxSLeE ला भेट द्या किंवा कोणत्याही तत्काळ मदतीसाठी आमच्या ऑन-ग्राउंड टीमशी संपर्क साधा. फ्लाइट स्थितीसाठी, https://bit.ly/3lpnChV ला भेट द्या. हे देखील वाचा: Uttar Pradesh Shocker: लखनऊमध्ये धक्कादायक प्रकार, लोडेड बंदूकीसोबत खेळणं जीवावर बेतलं, गोळी लागून १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पाहा पोस्ट:

#6ETravelAdvisory: Flights to/from #Mumbai are impacted due to heavy rains. To opt for an alternate flight or claim a full refund, https://t.co/6643rYe4I7 or feel free to reach out to our on-ground team for any immediate assistance. For flight status, https://t.co/qyXdpB4rZm

— IndiGo (@IndiGo6E) July 8, 2024

IMD ने महाराष्ट्रात तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 8 जुलै ते 10 जुलै 2024 या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज भरतीची वेळ दुपारी 1.57 आहे. या काळात समुद्रात 4.4 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे लोकांना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement