Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबई मध्ये उद्याचे हवामान कसे असणार? पहा IMD चा अंदाज

बीएमसी ने शाळा-कॉलेजला उद्या 26 जुलै साठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Udyache Havaman Mumbai | File Image

मुंबई (Mumbai) मध्ये आज मुसळधारा कोसळत असताना उद्या 26 जुलै दिवशी देखील मुंबई शहराला रेड अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार मुंबई शहरात उद्या 26 जुलै दिवशी सकाळी 8.30 पर्यंत रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन केले आहे. बीएमसी ने शाळा-कॉलेजला आज 25 जुलै साठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई मध्ये आज मिठी नदी धोक्याची पातळी जवळ पोहचली आहे. त्यामुळे नदीपात्राच्या जवळ राहणार्‍या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज मुंबई मध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं रस्ते, रेल्वे मार्गवरील देखील वाहतूक मंदावली होती. Mumbai Rains: मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडक सागर देखील पूर्ण क्षमतेने भरलं (Watch Video) .

मुंबई मध्ये उद्याचे हवामान कसे राहील?

मुंबई मध्ये जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर 7 पैकी 4 धरणं पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे आता सध्या 29 जुलै पासून  ठाणे शहर, भिवंडी आणि शहराबाहेरील ग्रामपंचायतींना 10% पाणीकपात मागे घेतली आहे.  या भागात BMC द्वारे पाणी पुरवठा केला जातो. हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी  पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे