Mumbai Water Crisis: पाणी जपून वापरा....आजपासून पाणी कपात,मुंबईत 10 टक्के पाणी कपात

तोपर्यंत पाणी कपात असल्याचे सांगितले आहे.

mumbai dam (Photo credit-wikimedia common)

Mumbai Water Crisis: मुंबईत मुसळधार पाऊस चालू असताना देखील महामालिकेने आज पासून पाणी कपात असल्याचे जाहिर केले आहे. 1 जुलै म्हणजे आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मान्सून लांबणीवर गेल्यामुळे तलावाच्या साठ्यात फक्त 6.97 टक्के पाणी आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात येते काही दिवस पाणी कपात केले जाण्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे सर्वे जलाशय पाण्याच्या पातळीत वाढ होवू लागले आहे.

धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे महापालिकेने 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय जूनच्या शेवटच्या आठवडय़ात घेतला होता.राज्यात दुसरीकडे पाणी पुरवठा कमी झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या  मोडक सागर,वैतरणा,  मध्य वैतरणा, भातसा,तानसा, विहार, तुळशी या सातही धरणांत सध्या एक लाख 57 हजार 412 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मागील चार दिवसांपासून चांगला पाऊस असल्याने मागच्या वर्षीपेक्षा पाणी साठा वाढला आहे. मुंबईत पाणीपुरवठा करताना यातील एक टक्के पाणीसाठा हा तीन दिवसासाठी पुरतो त्यामुळे जवळपास 26 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.