Mumbai Vaccination: मुंबई बाहेरील खासगी लसीकरण केंद्राना शहारात लस देण्यास परवानगी नाही
त्यामुळे विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत.
Mumbai Vaccination: राज्यासह मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक कमी होत चालला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत. दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेग वाढवला गेल्याने दिवसभरात हजारोंच्या संख्येने लसीकरण होत आहे.अशातच आता खासगी लसीकरणासंदर्भत महापालिका आयुक्तांनी गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मुंबई बाहेरील लसीकरण केंद्रांना शहरात लस देता येणार नाही आहे. या लसीकरण केंद्रांनी औद्योगिक संस्था, गृहकुल येथे लसीकरण मोहिम राबवण्यापूर्वी संबंधित संस्थेसोबत सामंज्यस करार करणे असे गाइडलाइन्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
खासगी लसीकरण केंद्रांना त्यांच्याकडील रुग्णवाहिकेची संख्या, वैद्यकिय कर्मचारी यांची पुरेश्या प्रमाणात उपलब्धता असणे गरजेचे असणार आहे. त्याचसोबत या लसीकरण केंद्रांनी राजकीय पक्षाची जाहीरातबाजी सुद्धा करु नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गाइडलाइन्सच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास सदर लसीकरण केंद्राच्या विरोधात कारवाई केली जाईल. तसेच त्या केंद्राची मान्यता ही रद्द केली जाणार आहे.(Mumbai: मुंबईतील लसीकरण स्थळावर राजकीय पक्षांचे बॅनर आणि होर्डिंग्ज लावणाऱ्या केंद्राची मान्यता रद्द केली जाणार)
तर कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, जास्तीत जास्त लोकांना लस मिळावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी लस उत्पादकांनी ठरविलेले दर आणि त्यावर लागू होणारे कर हे लक्षात घेऊन केंद्राने कोरोना लसीचे कमाल दर निश्चित केले आहेत. त्यानुसारच खासगी रुग्णालयांनी लसींचे दर आकारण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.(Corona Cases in Dharavi Today: दिलासादायक! धारावीकरांनी थोपवली कोरोनाची दुसरी लाट, गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधितांची नोंद नाही)
दरम्यान, राज्य सरकारने 4 जूनच्या मध्यरात्री आदेश जारी केले आणि महाराष्ट्र अनलॉक करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम एकदाचा संपला. त्यावेळ राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन हटवला जाणार आहे. महाराष्ट्र पाच टप्प्यांमध्ये अनलॉक होत असताना टप्पानिहाय काही निर्बंध कायम आहेत. तर काही टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. काही सेवा सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर काहीसेवा बंदच राहणार आहेत.