Mumbai University First Merit List 2023 Released: मुंबई विद्यापीठाची पहिली मेरीट लिस्ट जारी; जाणून घ्या कशी पहाल कट ऑफ लिस्ट
MU ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी कागदपत्र पडताळणी 20 ते 27 जून दरम्यान केली जाईल. दुसरी आणि तिसरी यादी अनुक्रमे 28 जून आणि 6 जुलै रोजी जाहीर होईल.
बारावीच्या निकालानंतर पदवीच्या कोर्ससाठी अॅडमिशनसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज (19 जून) मुंबई विद्यापीठाची पहिली मेरीट लिस्ट 2023 (Mumbai University First Merit List) जारी करण्यात आली आहे. याद्वारा अंडर ग्रॅज्युएट प्रोगामची (Undergraduate Program) प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये ज्या कोर्ससाठी अर्ज केला होता त्यासाठीची कट ऑफ, मेरीट लिस्ट संबंधित कॉलेजच्या वेबसाईट वर पाहता येणार आहे. मेरीट लिस्ट मध्ये उमेदवाराचं नाव, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, स्कोअर, क्वालिफाईंग मार्क्स, कम्बाईंड रॅन्क, प्रवेश देण्यात आलेलं कॉलेज याची माहिती दिली जाणार आहे.
कशी पहाल मुंबई विद्यापीठाची पहिली मेरीट लिस्ट?
MU colleges च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
विशिष्ट कोर्स साठीच्या पहिल्या मेरीट लिस्टच्या लिंक वर क्लिक करा.
पीडीएफ मध्ये यादी स्क्रिन वर दिसेल.
आता त्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव सर्च करा.
आता कट ऑफ पहा, तुमच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक पहा आणि पुढील निर्णय घ्या.
(नक्की वाचा: University of Mumbai Admission Schedule 2023: बारावीच्या निकालानंतर आता पदवीच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जारी; पहिली यादी 19 जूनला).
MU ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी कागदपत्र पडताळणी 20 ते 27 जून दरम्यान केली जाईल. दुसरी आणि तिसरी यादी अनुक्रमे 28 जून आणि 6 जुलै रोजी जाहीर होईल. अॅडमिशन साठी आवश्यक कागदपत्रं घेऊन तुमचं अॅडमिशन वेळीच पसंतीच्या कॉलेज मध्ये पक्कं करा.
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

