शिक्षण संस्था आणि त्यांच्या परीक्षांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, Coronavirus चा काय होणार बदल?

या याचिकेमागची खरी चिंता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी आहे’. खंडपीठाने विद्यापीठाला या याचिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी आज होणार आहे.

Bombay High Court (Photo Credits: Twitter/ ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. तसेच केवळ दहावी-बारावी (SSC-HSC) च्या परीक्षा सुरु ठेवण्याची परवानगी सरकारने दिली होती.असे असताना मुंबई विद्यापीठ (Mumbai University) 23 मार्चपासून ठरल्या वेळेप्रमाणे बीकॉम (BCom) ची परीक्षा सुरु करत आहे. सोडून अन्य परीक्षा 31 मार्च पर्यंत तर विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सागर जोंधळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. जोंधळे यांच्या याचिकेत म्हटले आहे की, ‘या परीक्षांमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई विद्यापीठाने घ्यावी. या याचिकेमागची खरी चिंता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी आहे’. खंडपीठाने विद्यापीठाला या याचिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी आज होणार आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर मुंबईत शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, मॉल्स बंद ठेवण्यात आले आहेत. अशातच मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे न ढकलता ठरल्या तारखेप्रमाणे घेण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत सागर जोंधळे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणूबाबत बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल; BCOM परीक्षेबाबत कोर्टाने मुंबई विद्यापीठाला बजावली नोटीस

या परीक्षेसाठी बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असून याची जबाबदारी मुंबई विद्यापीठाने घ्यावी असे यात म्हटले आहे. त्यामुळे शिक्षण संस्था आणि अन्य परीश्रा याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात आज काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारने ठरलेल्या तारखेनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. अशात मुंबई विद्यापीठाची बी कॉमच्या सेमिस्टर 6 ची परीक्षा ठरलेल्या वेळेनुसार 23 मार्चपासून सुरू होत आहे. तसेच अनेक ठिकाणी सरकारच्या निर्णयाचे पालन होत नाही. याचबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. जोंधळे यांचे वकील मिलिंद देशमुख यांनी सोमवारी कोर्टाला सांगितले की, विद्यापीठाच्या परीक्षा 23 मार्चपासून सुरू होणार आहेत, त्यात अनेक लाख विद्यार्थ्यांचा समावेश असेल. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif