Mumbai Traffic Updates: मुंबईत जोरदार पावसाने लोकल ट्रेन, BEST Bus चा वेग मंदावला; इथे पहा अपडेट्स

मुंबईत जोरदार पावसामुळे रेल्वे ट्रॅक, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकीचा वेग आज मंदावला आहे.

मुंबई ट्राफिक । PC: File Photo

मुंबईकरांची सकाळ आज दमदार पावसामध्ये झाली आहे. रात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे शहरात सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. परिणामी आता कामानिमित्त बाहेर पडणार्‍या नागरिकांसमोर आता पाण्यातून रस्ता काढत कामाच्या ठिकाणी पोहचण्याचं आव्हान असणार आहे. मुंबईत सायन (Sion) मधील गांधी मार्केट (Gandhi Market) चा परिसरत, वडाळा (Wadala) येथे पाणी साचलं आहे. तर चुनाभट्टी स्थानक देखील पावसामुळे मंदावलं आहे. अनेक सखल भागात रेल्वे ट्रॅक वर पाणी आले आहे त्यामुळे वाहतूक मंदावल्याचं चित्र आहे. दरम्यान पाऊस जोरदार असला तरीही रेल्वे आणि रस्ते वाहतूक नियमित ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नक्की वाचा: Mumbai Rains: सायन, वडाळा भागात साचलं पाणी; हवामान खात्याकडून पुढील 24 तास उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा.

मध्य रेल्वे कडून सद्य स्थिती पाहता लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर बेस्ट बस कडून देखील पाणी साचलेल्या भागांची यादी देत ज्या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे त्याची माहिती देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे अपडेट्स

बेस्ट बस डायव्हर्जन

मुंबईत पाणी साचलेले परिसर

हवामान विभागाकडून केएस होसाळीकर यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगर आणि ठाणे भागात आभाळ भरून  आलेले आहे. या भागात पुढील 3-4 तास अति मुसळधार पाऊस बरसू शकतो. तर मुंबई प्रमाणेच कोकण किनारपट्टी वर देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.