मुंबई मधील वाहतूक कोंडी जागतिक स्तरावर अव्वल, दिल्ली चौथ्या क्रमांकावर

त्यामुळे 'आमची मुंबई' (Aamchi Mumbai) म्हणणाऱ्या मुंबईकरांना वाहतुक कोंडी ही नवी गोष्ट नाही

ट्राफिक (प्रातिनिधिक फोटो ) Photo Credits PTI

मुंबईत (Mumbai) कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. त्यामुळे 'आमची मुंबई' (Aamchi Mumbai) म्हणणाऱ्या मुंबईकरांना वाहतुक कोंडी ही नवी गोष्ट नाही. मात्र मुंबईतील वाहतुक कोंडीचा क्रमांक आता जागतिक स्तरावर अव्वल स्थानी पोहचला आहे. त्यामुळे मुंबईची सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणारे शहर म्हणून ओखळ झाली आहे.

टोमटोम ट्राफिर इंटेक्स 2018 मधील एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आल्याचे उघड झाले आहे. या सर्वेक्षणातून जगभरातील 400 शहरांचा अभ्यास करण्यात आला असून त्यामध्ये मुंबईचा क्रमांक जागतिक स्तरावर अव्वल स्थानी लागला आहे.(मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, महापालिकेचे नागरिकांना आवाहन)

तर राजधानी दिल्लीचा क्रमांक हा चौथ्या स्थानकावर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र दिल्लीमधील 2018 मधील वाहतूक कोंडी ही 58 टक्क्यांवर पोहचली आहे. तसेच ग्लोबल रँकिंगनुसार बोगोटा (Bogota) 63 टक्के, लिमा (Lima) 58 टक्के, नवी दिल्ली (New Delhi) 58 टक्के आणि मोस्को (Moscow) 56 टक्क्यांपर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याची ही 6 शहरे असल्याचे म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif