Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ 2 तासांनी कमी होणार; अटल सेतू 8 लेन एक्स्प्रेस वेने सोलापूर आणि साताऱ्याला जोडला जाणार

या नवीन महामार्गामुळे अटल सेतू ते सोलापूर, सात्रळा असा थेट रस्ता निर्माण होणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवासासाठी कमी वेळ लागणार आहे.

Atal Setu (PC- X/ANI)

Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवास आता सोपा होणार आहे. शिवडी न्हावा शेवा सी लिंक हायवे (Shivdi Nhava Sheva Sea Link Highway) म्हणजेच अटल सेतू (Atal Setu) आता सोलापूर आणि सातारा यांना एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) ने जोडला जाणार आहे. या नवीन एक्स्प्रेस वेसाठी 17 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. या नवीन महामार्गामुळे अटल सेतू ते सोलापूर, सात्रळा असा थेट रस्ता निर्माण होणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवासासाठी कमी वेळ लागणार आहे.

मुंबई ते पुण्याचा प्रवास सोपा होईल -

यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHI) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या नवीन महामार्गाच्या निर्मितीमुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ दीड तासाने कमी होणार आहे. नवीन प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जातील. हा 130 किमी लांबीचा एक्स्प्रेस वे चौक-पुणे-शिवरे जंक्शनपर्यंत पोहोचेल. जलद प्रवासासाठी या मार्गावर एकूण 8 लेन असतील. या रस्त्याच्या बांधकामासाठी 17500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या या महामार्गाची रूपरेषा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार करण्यात येत आहे. (हेही वाचा -Cracks On Atal Setu Viral Video: अटल सेतूच्या रस्त्याची पहिल्याच जोरदार पावसानंतर दुर्दशा; नाना पटोले यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकार वर टीका)

सध्याच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अनेकदा जड वाहतुकीचा सामना करावा लागतो. विशेषत: घाट भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात. द्रुतगती महामार्गालगत वाढलेले शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे गर्दीची समस्या वाढली आहे. यावर उपाय म्हणून लोणावळा परिसरात प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी ‘मिसिंग लेन’ बांधण्यात येत असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. (हेही वाचा - Suicide Attempt on Atal Setu: अटल सेतूवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी चपळाईने वाचवले प्राण (Watch Video))

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच अटल सेतूला जोडणाऱ्या आणखी एका महामार्गाची योजना जाहीर केली होती. बेंगळुरू आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणारा 14 लेनचा रस्ता तयार केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. हा रस्ताही पुणे रिंगरोडशी जोडला जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif