Mumbai: प्रियकराच्या मदतीने पत्नीने आवळला पतीचा गळा, वसई येथील घटना
पोलिसांनी सदर महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचे नाव मुन्नीदेवी असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती 24 वर्षांची आहे. तर संजय प्रसाद असे तिच्या 24 वर्षीय प्रियकराचे नाव आहे.
विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पोलिसांनी सदर महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचे नाव मुन्नीदेवी असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती 24 वर्षांची आहे. तर संजय प्रसाद असे तिच्या 24 वर्षीय प्रियकराचे नाव आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या संबंधातूनच दोघांनी संगनमताने महिलेच्या पतीची हत्या केली, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. सुनील दुबे ( वय-32 वर्षे) असे मृताचे नाव आहे.
सुनील दुबे हा वसई (पूर्व) येथील परिसरातील वागराळपाडा येथे आपली पत्नी मुन्नी देवी हिच्यासोबत राहात होता. उदरनिर्वाहासाठी तो भाजीविक्रीचा व्यवसाय करत असे. सुनील दुबे याचा मृतदेह वसई (पूर्व) येथील वागराळपाडा येथील एका खदानीत 31 मार्च रोजी सकाळी 8 च्या सुमारास आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह त्याच परिसरातील राहणाऱ्या व्यक्तीचा असून त्याचे नाव सुनील दुबे असल्याचे पुढे आले होते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात सुनील दुबे याचा मृत्यू नैसर्गिक नव्हे तर गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी केलेल्या पुढील तपासात दुबे यांची पत्नी मुन्नीदेवी हिचे त्याच परिसरातील रहिवासी संजय प्रसाद (24) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. या माहितीनंतर पोलिसांनी सुनील दुबे यांच्या पत्नीची भेट घेतली. पत्नीकडे केलेल्या चौकशीदरम्यान, या प्रेमसंबंधाबद्दल पुष्टी झाली. त्यातूनच मुन्नीदेवी आणि तिच्या प्रियकराने दुबे याला संपविण्याचा संपवण्याचा निर्णय घेतला.
सुनील दुबे याला मुन्नीदेवी हिच्यासोबत संजय दुबे याच्या असलेल्या प्रेमसंबंधाबाबत माहिती होती. मात्र, आपले असे काही संबंध नाहीत हे सांगण्यासाठी संजय हा सुनील याने दारु पाजण्यासाठी नेले. तेथून ते टेकडीवर गेले. त्यानंतर संजय याने सुनील यास खदानीत ढकलले. यात संजयच्या डोक्याला मार लागला पण तो जिवंत राहिला. हे असल्याचे लक्षात येताच, संजयने खाणीत जाऊन नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी सांगितले की, मुन्नीदेवी ही घटनास्थळी गेली नसून, तिनेच संजयसोबत हत्येची योजना आखली होती. दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.