Mumbai: ऑनलाईन क्लास दरम्यान 10 वर्षीय विद्यार्थीनीला अश्लील स्टीकर्स पाठवणारा शिक्षक अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6-7 सप्टेंबर रोजी ऑनलाईन क्लास सुरु असताना शिक्षकाने विद्यार्थीनीला अश्लील स्टिकर्स पाठवले.
ऑनलाईन क्लास (Online Class) दरम्यान 10 वर्षीय विद्यार्थीनीला अश्लील स्टिकर्स (Vulgar Stickers) पाठवणाऱ्या शिक्षकाला सांताक्रुझ पोलिसांनी (SantaCruz Police) अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6-7 सप्टेंबर रोजी ऑनलाईन क्लास सुरु असताना शिक्षकाने विद्यार्थीनीला अश्लील स्टिकर्स पाठवले. शिक्षकाने रविवारी 3 स्टिकर्स पाठवले. मात्र थोड्या वेळाने ते डिलिट केले. त्यानंतर सोमवारी देखील शिक्षकाने एक अश्लील स्टिकर पाठवला. विद्यार्थीनीने ही बाब आपल्या पालकांच्या ध्यानात आणून दिली. त्यानंतर पालकांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. (Atpadi Gang Rape: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल)
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली. एफआयआर दाखल केल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. असे पोलिसांनी सांगितले. आरोपी 14 सप्टेंबर पर्यंत पोलिसांच्या ताब्यात असणार आहे.
इतर विद्यार्थ्यांसोबतही आरोपीने असे वर्तन केले आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, आरोपीवर भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) अंतर्गत विनयभंग करण्याचा, आयटी अॅक्ट (IT Act) आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्वी शिक्षकांनी विद्यार्थींनीवर बलात्कार, विनयभंग केलेल्या अनेक घटना देशातील विविध भागातून समोर आल्या आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणातही असे प्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अद्याप शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन माध्यमातून शिक्षक सुरु आहे. अशा प्रकराच्या घटना पाहता पालकांनी ऑनलाईन क्लासेस दरम्यानही मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Kerala Horror: केरळ मधील पठानमथिट्टा जिल्ह्यात कोरोना बाधित मुलीवर अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरकडून बलात्कार; आरोपी अटकेत)
कोविड-19 चे आरोग्य संकट देशासमोर उभे आहे. त्याबरोबरीने अनेक प्रश्न देशासमोर उभे ठाकले आहेत. मात्र स्त्रीयांवरील अत्याचार या कठीण काळातही सुरुच आहेत. कोरोना बाधित महिलांवर, अल्पवयीन मुलींवर बलात्कार होत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत.