Mumbai Shocker: दादरला तुतारी एक्सप्रेस मध्ये मृतदेह कोंबलेली सुटकेस चढवताना प्रवाशाची दमछाक पोलिसांनी हेरली अन हत्येचा झाला 4 तासात उलगडा
मात्र, पोलिसांनी प्रवीण चावडा याच्याकडून माहिती घेऊन त्याला उल्हासनगरमधून अटक केली आहे.
दादर स्थानकामध्ये (Dadar Station) प्लॅटफॉर्म वरील दोन पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने एका हत्याकांडाची उकल झाली आहे. सोमवारी तुतारी एक्सप्रेसने प्रवास करणार्या दोन प्रवाशांची बॅग उचलताना झालेली दमछाक पाहून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी अधिक विचारणा करता त्यांना बॅगेमध्ये एक मृतदेह आढळला. पायधुनी भागात ही हत्या झाली होती. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून सध्या पायधुनी पोलिसांकडेच (Pydhonie Police Station) ता प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला आहे.
दादर स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वर दोन मूकबधीर तुतारी एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यांच्या ट्रॉली बॅग होती. मात्र ट्रेनमध्ये ती चढवताना त्यांची दमछक होत होती. त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. हा प्रकार फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे यांच्या लक्षात आला. त्यांनी दोघा प्रवाशांना थांबवून बॅग उघडायला सांगितली. बॅगेमध्ये चक्क रक्ताने माखलेला एक मृतदेह होता. हा मृतदेह 30 वर्षीय अर्शद अली सादिक अली शेख चा होता. Virar Murder Case: विरारमध्ये 60 वर्षीय महिलेची जावयाकडून हत्या; आरोपीला अटक .
अर्शदच्या डोक्यावर घाव झाले होते. तो सांताक्रुझ मध्ये कलिना भागात राहत होता. दरम्यान त्याच्या हत्येच्या प्रकरणामध्ये शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोन मूकबधिरांना अटक करण्यात आली होती. या दोघांनी अर्शदचा मृतदेह कोकणात घेऊन जात त्याची विल्हेवाट लावण्याचा विचार केला होता पण त्यांचा प्रयत्न फसला. तुतारी एक्सप्रेसने कोकणात जात असताना त्यांना पोलिसांनी पकडलं आणि सारा प्रकार उघडकीस आला आहे. Murder Caught on Camera in Delhi: जीम मालकाची चाकूने भोसकून हत्या, आरोपीला अटक (Watch Video) .
दोन आरोपींपैकी शिवजित सिंह घटनास्थळावरुन पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी प्रवीण चावडा याच्याकडून माहिती घेऊन त्याला उल्हासनगरमधून अटक केली आहे. दरम्यान गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.