Girlfriend's Pressure In Extra-Marital Relationship: गर्लफ्रेंडची लग्नासाठीची अट पूर्ण करण्यासाठी बापानेच घेतला 2 वर्षीय मुलाचा जीव; प्लॅस्टिक बॅगेत भरून फेकला मृतदेह
22 वर्षीय बापाने 2 वर्षांच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह प्लॅस्टिक बॅगेत भरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार माहिम मध्ये समोर आला आहे.
22 वर्षीय बापाने 2 वर्षांच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह प्लॅस्टिक बॅगेत भरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय गर्लफ्रेंड सोबत लग्न करण्यासाठी तिने पहिल्या बायको आणि मुलाला दूर करण्याची अट घातली होती. ही अट पूर्ण करण्यासाठी आरोपीने पोटच्या मुलाचा जीव घेतला असल्याची माहिती शाहू नगर पोलिसांनी दिली आहे. ही घटना मुंबईच्या माहिम (Mahim) परिसरातील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी Rehmat Ali Shaukat Ali Ansariहा 22 वर्षीय आहे. माहीमच्या Hyatt Compound मध्ये त्याने मुलाचा खून केला. त्यानंतर मृतदेह प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून मृतदेह खारफूटीत फेकून दिले. रेहमत हा जनता सोसायटी मध्ये राहत होता. काल रात्री उशिरा तो पत्नी ताहिरा बानो सोबत पोलिस स्टेशन मध्ये गेला. त्याने पोलिसांना आपला मुलगा किंवा त्याच्याशी साधर्म्य असलेलं कुणी आढळलं का? हे विचारण्यासाठी पोहचला होता. पोलिसांनी जेव्हा त्याला मिसिंग रिपोर्टसाठी तक्रार नोंदण्यास सांगितलं तेव्हा त्याने टाळाटाळ केली. नक्की वाचा: Surat Shocker: सूरत मध्ये अल्पवयीन आईनेच घेतला नवजात बाळाचा जीव; पोलिसांनी तासाभरात उलगडलं हत्येचं गुढ!
बुधवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास पोलिसांना स्थानिकांनी 2 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याचं कळवलं. Hyatt Compound समोर मिठी नदीमध्ये 2 वर्षीय मुलाचा प्लॅस्टिक मध्ये गुंडाळलेला मृतदेह होता.
पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर आरोपीच्या पत्नीने पतीवर संशय व्यक्त केला. 'असद आणि रहमतच्या मोठ्या भावाची दोन मुले मंगळवारी रेहमतसोबत रात्रीच्या जेवणानंतर चीज बॉल्स खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती आणि भावाची मुले घरी परतली पण असद आला नाही.' असं ती म्हणाल्याचं पोलिस सांगतात.
ताहिरा बानोने तिच्या पतीला असदबद्दल विचारलं तेव्हा त्याने तिला रेहमतने सांगितले की त्याच्या मित्रांना भेटायला जाण्यापूर्वी त्याने असदला गेटवर सोडले होते. पण तिला रेहमतवर अफेअर असल्याचा संशय आल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि रेहमतच्या मोठ्या भावालाही फोन केला, पण रेहमत त्याच्या कथेवर ठाम राहत तेच तेच सांगत राहिला.
पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही च्या आधारे रेहमतचा शोध सुरू केला. रेहमत यानंतर उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या विचारामध्ये होता. मागील 3 वर्षांपासून रेहमत हा त्यांच्याच नात्यातल्या 20 वर्षीय तरूणीच्या प्रेमात पडला तिच्यासोबत रेहमतचं डेटिंग सुरू होते.
चीझ बॉल विकत घेण्याच्या बहाण्याने बाहेर पडलेल्या रेहमतने असदला जवळच एका दुकानात नेले. त्याचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून फेकला. नंतर मुलाला शोधण्यासाठी तो देखील कुटुंबियांसोबत बाहेर पडला.
दरम्यान पोलिसांनी किडनॅपिंग आणि मर्डरचे गुन्हे त्याच्यावर लावले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)