Coronavirus: मुंबईत एकूण 38 हजार 220 जणांना कोरोनाची लागण; गेल्या 24 तासात 1 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद तर, 54 मृत्यू
तर, 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 38 हजार 220 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत (Mumbai) आज 1 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 38 हजार 220 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही सकारात्मक बदल दिसून आला नाही.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्रात आज नव्या 2940 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर 99 जणांचा बळी; राज्यातील COVID19 चा आकडा 65 हजारांच्या पार
ट्विट-
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.