Mumbai: बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलिस व्हॅनमधून पळ; शोध सुरु
मुंबईमधील कांदिवली येथून ही घटना समोर येत आहे.
बलात्काराच्या (Rape) आरोपीखाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एक 21 वर्षीय आरोपी फरार झाला आहे. मुंबई (Mumbai) मधील कांदिवली (Kandivali) येथून ही घटना समोर येत आहे. बुधवारी शब्तादी हॉस्पिटलमध्ये (Shatabdi Hospital) कोविड-19 च्या रॅपिड अंटीजन टेस्ट (Rapid Antigen Test) झाल्यानंतर त्याला कोर्टात नेत असताना त्याने पोलिसांच्या गाडीतून उडी मारुन पळ काढला. कांदिवली येथील एका सिग्नलला गाडी उभी असताना त्याने संधी साधली. अविनाश यादव असे या आरोपीचे नाव असून घटनेच्या वेळी त्याला हातकड्या घातलेल्या होत्या. पोलिस त्याच्या शोध घेत असून अद्याप तरी त्याचा शोध लागलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 26 मध्ये यादव याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कांदिवली येथील चारकोप गावांत लक्ष्मी नगर तलावाजवळ राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. यादव याने त्यांच्या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. (सांभाळ जिल्ह्यातील 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार; घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर केला व्हायरल)
ANI Tweet:
अटक केल्यानंतर बुधवार पर्यंत त्याला पोलिस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये कोविड-19 टेस्ट साठी नेण्यात आले. तेथून पुढे कोर्टात घेऊन जात असताना एमजी रोड जवळील सिग्नलवर पोलिसांची व्हॅन थांबली असता संधी साधत यादवने पोलिसांना ढकलले आणि गाडीतून उडी मारुन पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांनी यादववर पोलिस कोठडीतून पळ काढल्याचा दुसरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.