Mumbai Rains: मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीलगत जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; IMD कडून अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आयएमडीने मुसळधार पाऊस आणि ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ आणि पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागांसाठी पावसाचे अलर्ट जारी केले आहेत.
Weather Updates Mumbai and India:आभाळात मेघांची दाटी, हलक्या सरी (Mumbai Rains) आणि उष्णतेपासून मुंबईकरांची झालेली सुटका यांमुळे मुंबई शहरातील वातावरण शनिवारी (24 सकाळी) काहीसे अल्हाददायक झाले. भारतीय हवामान खात्याने (IMD) हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तवताना शहरात दिवसभर 'सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश आणि मुसळधार पाऊस' पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तसेच, मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीलगत जोरदार पाऊस बरसण्यासारखी स्थिती असल्याने नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय आयएमडीने महाराष्ट्रासह किनारपट्टीलगत असलेल्या इतरही अनेक राज्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
ठाणे येथील भिवंडी-वाडा रस्त्यावर वाहतूक कोंडी
ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी-वाडा रस्त्यावर मोठे नुकसान झाले. पावसामुळे मोठे खड्डे पडले आणि वाहतूक विस्कळीत (Bhiwandi Traffic Jam) झाली. रस्त्याच्या बांधकामामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली, ज्यामुळे गुरुवारी मोठी वाहतूक कोंडी झाली. प्राप्त माहितीनुसार, रस्त्यावर 8 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी पसरली होती, ज्यामुळे अनेक प्रवासी चार तासांहून अधिक काळ अडकले होते. (हेही वाचा, Maharashtra Breaks 34-Year Rainfall Record: महाराष्ट्रात पावसाने मोडला 34 वर्षांचा विक्रम; राज्यात 1990 नंतर प्रथमच 844% जास्त पाऊस)
पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा
आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर, विशेषतः कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाळी परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Severe Rainfall Alert: महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा; पहा रायगड, दक्षिण कोकण, मुंबई चा हवामान अंदाज)
दिल्लीचा गडगडाटी वादळ आणि गारपीटीचा सामना
राष्ट्रीय राजधानीत बुधवारीही धुळीचे वादळ, गडगडाट, गारपीट आणि अनेक भागात मुसळधार पाऊस यासह तीव्र हवामानाचा अनुभव आला. या परिस्थितीमुळे शहराच्या काही भागात वाहतूक आणि वीज पुरवठ्यात लक्षणीय व्यत्यय आला. (हेही वाचा, Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची शक्यता; IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या Real-Time Status)
अनेक राज्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सकाळी 8.30 ते शुक्रवारी सकाळी 5.30 पर्यंत विविध प्रदेशांसाठी पावसाची आकडेवारी जाहीर केली. ज्यामध्ये लक्षात येते की, गंगीय पश्चिम बंगाल, कोकण आणि गोवा, किनारी आंध्र प्रदेश आणि ईशान्य भारतासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. अहवालातील काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे:
गंगेचे खोरे पश्चिम बंगाल (Gangetic West Bengal)
हल्दिया (पूर्व मेदिनीपूर): 10 सेमी
डायमंड हार्बर (दक्षिण 24 परगणा): 9 सेमी
दम दम आणि अलीपूर (कोलकाता आणि उत्तर 24 परगणा): प्रत्येकी 4 सेमी
दिघा (उत्तर 24 परगणा): 2 सेमी
कोकण आणि गोवा
पणजीम (उत्तर गोवा): 9 सेमी
मुंबई (सांताक्रूझ): 3 सेमी
रत्नागिरी (रत्नागिरी): 3 सेमी
आयएमडी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. मुसळधार पावसामुळे प्रभावित भागातील रहिवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि संभाव्य व्यत्ययांसाठी तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)