Mumbai Rains Forecast: भारतीय हवामान विभागाचा अंदाज, मुंबई आणि मुंबई उपनगरात अति मुसळधार पावसाचे जोर कायम

मुंबई सह रायगड, पालघर, ठाणे ह्या शहरात देखील मुसळधार पावसाचे अंदाज वर्तवले आहेत.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

 Mumbai Rain Forecast:  मान्सून लांबणी नंतर गेल्या तीन दिवसांपासून शहरात आणि राज्यात अनेक  ठिकाणी मुसळधार  पाऊस चालूच आहे. ह्या पावासामुळे अनेक ठिकाणी वाहतूकीवर परिणाम झालेले दिसून आले आहे. मुंबई शहरात आज मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने  (IMD)वर्तवला आहे. मुंबईत आज यलो अर्लट (Yellow Alert) जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईसह  रायगड, पालघर, ठाणे शहरात आज अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगरात अति मुसळधार पावसाचे अंदाज वर्तवले आहे. बुधवारी सकाळी8.00 ते शुक्रवार सकाळी 8.00 वाजेपर्यंत, मुंबईत सरासरी 93 मिमी पाऊस झाला, तर पूर्व उपनगरात 127 मिमी आणि पश्चिम उपनगरात 123 मिमी पावसाची पडल्याची नोंद झाली. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त एकबाल सिंग चहल  (Ekbal singh chahal)यांनी मुंबईतील पाणी साचलेल्या ठिकाणी किंग सर्कल परिसरातील गांधी नगर आणि मिठी नदी येथे पाहणी केली आहे.

मुंबईत काही प्रमाणात वादळी वाऱ्यासंग पाऊस असल्याने भायखळा परिसरात भलं मोठ झाड एका व्यक्तीच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने गुरूवारी पावसाचा जोर कायम असल्याचे सांगितले आहे आणि मुंबईत शुक्रवारी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाने काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले आहे.