Mumbai-Thane Traffic Update: मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प, गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचला
मुंबई आणि ठाणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली असून, गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्याची घटना घडली आहे. IMD ने जोरदार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Traffic Police Alert: मुंबई शहर, उपनगरे (Mumbai Rains 2025) आणि लगतच्या ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी (16 जून) रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत रस्ते जलमय झाले असून वाहने अत्यंत संथ गतीने पुढे सरकत (Thane Traffic Jam) आहेत. विशेषतः आनंद नगरजवळील घोडबंदर रोड (Thane-Ghodbunder Road Heavy Traffic Jam) सर्वाधिक प्रभावित झाला आहे. हा मार्ग ठाणे आणि मुंबई शहरास जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कारपासून ते बसपर्यंत अनेक वाहने पावसामुळे रस्त्यावर अडकलेली दिसून येतात.
मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा अलर्ट
पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना IMD च्या सूचनेनुसार खाडी किनारी व सखल भागांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. पोलीस विभागाने सांगितले की, त्यांचे कर्मचारी सतर्क आहेत आणि गरज पडल्यास नागरिकांना मदत करण्यासाठी तत्पर राहतील. (हेही वाचा, Mumbai Rains: मुंबईमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा; वांद्रे, मलबार हिल, लोअर परळ, माटुंगा, हाजी अलीया भागांत सतर्कतेचा इशारा)
घोडबंदर रोडवर वाहनाच्या रांगा
#WATCH | Maharashtra | Long queue of vehicles on Mumbai-Thane road at Anand Nagar, Thane, as the area continues to receive rainfall since last night pic.twitter.com/EIhDX3wKTv
— ANI (@ANI) June 16, 2025
आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक
प्रशासनाकडून 100, 112 आणि 103 हे आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून, नागरिकांनी अडचण आल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. IMD ने मुंबई आणि उपनगरांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे आणि अत्यावश्यक नसलेल्या प्रवासापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा, Pune Bridge Collapse Update: पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू, 55 जणांना वाचवण्यात यश; बचाव कार्य पूर्ण)
मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी
In view of the heavy rain alert issued by IMD across Mumbai city and suburbs, citizens are requested to avoid visiting coastal and low-lying areas.
Our officials and staff are alert and ready to assist Mumbaikars. Dial 100 / 112 / 103 in case of any emergency.#MumbaiRainAlert…
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) June 16, 2025
जोरदार पावसात दक्षिण मुंबईतील गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ एका रस्त्याचा काही भाग सोमवार सकाळी खचला. हे मेट्रो स्थानक अद्याप बांधकामाधीन असून लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा होती. या घटनेत BEST बस रस्त्याच्या खड्ड्यात अडकली, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, त्यात बसचे मागचे चाक खड्ड्यात अडकलेले दिसत आहे. बस थोडीशी झुकलेली असून अतिरिक्त अपघात टाळण्यासाठी परिसरात अडथळे निर्माण करून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
प्रशासनाने संबंधित भागात मदतीसाठी पाठवपुरावा सुरू केला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पुढील काही तास पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिकृत स्त्रोतांकडून अपडेट मिळवत राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, केवळ मुंबई आणि ठाणेच नव्हे तर उर्वरीत महाराष्ट्रातही दमदार पावसाचे आगमन झाले आहे. यंदाच्या वर्षी नेहमीच्या तुलनेत काहीशी लवकर हजेरी लावलेला मान्सून पाऊस, अचानक गायब झाला होता. मात्र, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 12 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून तो आपली उपस्थिती चांगलीच जाणवून देतो आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस आपली उपस्थित दाखवत असून, शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष चांगले असेल असे बोलले जात आहे. तरिसुद्धा कृषीविभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीच इशारा दिला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

