मुंबई: राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, भाजप पक्षात प्रवेश करणार?

मुंबईत मधील निवासस्थानी एक बैठक बोलावण्यात आली होती.

राधाकृष्ण विखे पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज (4 जून) आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मुंबईत मधील निवासस्थानी एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी विखे-पाटील यांनी विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिला होता.

परंतु लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर सुजय विखे यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे सोपवला होता. मात्र लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश करावा अशी विनंती भाजप पक्षाचे अहमनगर येथील खासदार सुजय विखे यांनी केली होती.

(खा. सुजय विखे पाटील यांची वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना ऑफर, 'आता काँग्रेस सोडा, भाजपमध्ये या')

त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील भाजप पक्षात प्रवेश करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच आमदार अब्दुल सत्तार सुद्धा भाजप पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. परंतु सत्तार यांच्या प्रवेशाबद्दल भाजपकडून विरोध होत असल्याचे म्हटले जात आहे.