Mumbai - Pune Expressway Viral Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर थरार, बंदूक दाखवून ओव्हरटेक, गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हायरल

ज्या कारमधून काही लोक बंदूक दाखवत आहेत त्या कारच्या मागच्या बाजूला शिवसेना पक्षाचे एक स्टीकरही पाहायला मिळत आहे. या स्टीकरवरुन गाडीत असलेले लोक हे शिवसैनिक असावेत असा अंदजा लावला जात आहे.

Mumbai - Pune Expressway Viral Video | (Photo Credits: Video Screenshot)

[Poll ID="null" title="undefined"]कारच्या खिडकीतून बंदूका बाहेर काढून धाक दाखवत ओव्हरटेक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ( Mumbai - Pune Expressway) घडला आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल ( Mumbai - Pune Expressway Viral Video ) झाला आहे. एमआयएम खासादार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel ) यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि महाराष्ट्र पोलिसांनाही (Maharashtra Police) टॅग केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजते.

इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना हा व्हिडिओ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील (एक्सप्रेस-वे वरील)असल्याचा दावा केला आहे. ज्या कारमधून काही लोक बंदूक दाखवत आहेत त्या कारच्या मागच्या बाजूला शिवसेना पक्षाचे एक स्टीकरही पाहायला मिळत आहे. या स्टीकरवरुन गाडीत असलेले लोक हे शिवसैनिक असावेत असा अंदजा लावला जात आहे.

इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, व्हिडिओत दिसणारे दृष्य हे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील आहे. कारवर शिवसेनेचे स्टीकर आहे. हे स्टीकरच सर्व काही सांगत आहे. कारमधील शिवसैनिक आपल्या कारने प्रवास करत असताना आपल्या रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करत होते. दरम्यान, हेच ट्विट मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत या अधर्माची दखल घेतली जाऊल का? असा सवालही जलील यांनी विचारला आहे. (हेही वाचा, Viral Photo: DSP पदावर कार्यरत असलेल्या आपल्या मुलीला पाहून इन्स्पेक्टर वडिलांनी केला सलाम; पहा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो)

दरम्यान, इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओखाली अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या थरारक प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाईची मागणी केली आहे. काहींनी हा उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही. हा महाराष्ट्र आहे. असाल थिल्लरपणा इथे खपवून घेतला जाणार नाही, असे म्हणत पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif