उद्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक दोन तास बंद राहणार, प्रवाशांचे होणार हाल
उद्या (9मे) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
उद्या (9मे) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 12 ते 2 दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याचे राज्य वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड यांच्यातर्फे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमी 55/600 आणि 88/00 ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तर जड सामान आणि मालवाहतूक घेऊन जाणारी वाहने द्रुतगती मार्गावरील 85/500 या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत.(मुंबई: आज बांद्रा येथील गर्डरच्या कामामुळे रात्रकालीन ब्लॉक, हार्बर-पश्चिम मार्गावरील वाहतूक वळवली)
तर चारचाकी आणि अन्य वाहाने येथील मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्ग (MH4) कडून मुंबईच्या दिशेला वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2019 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

