मुंबई पुणे आणि कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेन्सला जोडले जाणार अत्याधुनिक LHB Coaches, प्रवास होणार अधिक सुसाट आणि सुरक्षित

या एक्स्प्रेस 22 डब्यांच्या असणार असून त्यामध्ये 4 जनरल डबे 9 स्लीपर डब्यांचा समावेश आहे.

Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई -पुणे (Mumbai - Pune) आणि कोकण मार्गावरील रेल्वेचा (Konkan Railway) प्रवास आता अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे. पुढील महिन्यापासून कोकणकन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) आणि मांडवी एक्स्प्रेस (Mandovi Express) या ट्रेनसोबतच मुंबई पुणे मार्गावरील इंद्रायणी (Indrayani Express) आणि डेक्कन क्विन एक्स्प्रेसमध्ये (Deccan Queen) एलएचबी डब्बे (LHB Coaches) जोडले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.

LHB Coach चं वैशिष्ट्य काय?

10 जून ते 31ऑगस्ट या कालावधीत नवीन एलएचबी डब्यांसह कोकण मार्गावर दोन ट्रेन्स धावणार आहेत. या एक्स्प्रेस 22 डब्यांच्या असणार असून त्यामध्ये 4 जनरल डबे 9 स्लीपर डब्यांचा समावेश आहे. 1 सप्टेंबरपासून या दोन्ही एक्स्प्रेस कायमस्वरूपी एलएचबी डब्ब्यासह धावणार आहेत.