पवई: सोशल मीडियात वेश्याव्यवसायाची जाहिरात, हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापेमारी केली. यामध्ये हॉटेलच्या कॅशिअरला पोलिसांनी अटक केली आहे.

Sex Racket (Photo Credits- Twitter)

मुंबईतील पवई (Powai) येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापेमारी केली. यामध्ये हॉटेलच्या कॅशिअरला पोलिसांनी अटक केली आहे. तर संबंधित सेक्स रॅकेटमधील पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

सोशल मीडियात सोशल मीडियात एक मोबाईल क्रमांक पोस्ट करुन वेश्या व्यवसायासाठी जाहिरात करण्यात येत होती. त्या पोस्टमध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यास युजर्सला वेश्या व्यवसायाठी महिला पुरवल्या जातील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याबद्दल अधिक चौकशीसाठी बनावट ग्राहक तेथे पाठवला. त्यानंतर बनावट व्यक्ती सेक्स रॅकेट सुरु असलेल्या हॉटेलमध्ये गेला असता त्याला एका खोलीत जाण्यास सांगितल्यानंतर तेथे तीन महिला आल्या. तसेच बनावट व्यक्ती हा पोलिस असल्याचे कळू नये म्हणून त्याने कॅशिअरला त्या गोष्टींचे पैसे दिले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या हॉटेलवर धाड टाकत कॅशिअरला अटक केली आहे.(घरातूनच सेक्स रॅकेट चालविणा-या 56 वर्षीय गृहिणीस चारकोप परिसरातून अटक)

या प्रकरणी अद्याप एक व्यक्तीने पळ काढला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तर काही दिवसांपूर्वी चारकोप येथे एका इमारतीच्या घरात महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचा भांडाफोड झाला होता. तसेच महिला ग्राहकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून काही मुलींचे फोटो पाठवून हा व्यवहार करत होती. तेव्हा सुद्धा पोलिसांनी सापळा रचत महिलेला अटक केली होती.