मुंबई: फोर्ट येथील एका इमारतीचा भाग कोसळला, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल

इमारतीचा भाग कोसळला (Photo Credits-ANI)

मुंबई शहरात दमदार पाऊस कोसळत असल्याने सखल भागात पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला याच पावसाच्या काळात इमारतीचे भाग कोसळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. तर आता मुंबईतील फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.(Mumbai Rains: मुंबई मध्ये कालपासून मुसळधार पाऊस; 2015 नंतर 24 तासांत पडणाऱ्या दुसर्‍या सर्वाधिक पावसाची नोंद)

ANI यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली असून इमारतीचा भाग कोसळला आहे. या ठिकाणी आता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. तसेच फोटोमधून इमारतीचा बरासचा भाग खाली पडल्याचे ही दिसून येत आहे.

Tweet:

काही वेळापूर्वीच मालाड येथील अब्दुल हमीद मार्ग येथील चाळीचा भाग कोसळल्याची घटना समोर आली होती. या ठिकाणी सुद्धा बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात यत आहे. या ठिकाणी सुद्धा चार अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि एक रेस्क्यू व्हॅन दाखल झाली आहे.

मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसत आहे. यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये मरीन लाईन्स, ग्रॅंट रोड या दोन ठिकाणी इमारतीचा काही भाग कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या मुंबईमध्ये पुढील काही तास ढगाळ वातावरण राहील आणि पावसाला जोर कायम राहील अशी माहिती देण्यात आली आहे.