प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचं ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; शस्त्र घेऊन फिरणाऱ्या 33 जणांना अटक

यावेळी पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्या 40 जणांवर कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये 130 फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.

Mumbai Police| Representational Image (Photo Credits: ANI)

येत्या दोन दिवसांनी प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शहरात 24 तासांचं 'ऑल आऊट ऑपरेशन' (All Out Operation) केलं. यात पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या 33 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त परमबीर सिग, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आलं.

ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान, मुंबईत 223 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. यात रेकॉर्डवरील 1369 गुंडांची चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेल्या 52 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. याशिवाय 66 जणांना एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली. (वाचा - Farmer Laws: कृषी कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वात आंदोलक शेतकऱ्यांची नाशिक येथून मुंबईकडे कूच (Watch Video))

हे ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी शहरात 101 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी 8579 गाड्यांची तपासी करण्यात आली. तसेच 12 चालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली. याशिवाय एमव्ही कायद्यानुसार, 2479 ड्रायव्हरवर कारवाईही करण्यात आली.

ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत पोलिसांनी 739 हॉटेल्स आणि लॉजवर धाडी टाकल्या. यावेळी पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्या 40 जणांवर कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये 130 फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनच्या माध्यमातून केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.