Ganeshotsav 2020: गणेश चतुर्थी निमित्त मुंबई पोलिसांकडून शहरात कठोर सुरक्षा व्यवस्था
राज्यासह मुंबईत सुद्धा गणेशोत्सवाला आज पासून सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांकडून पुढील 10 दिवस कडक बंदोबस्त करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासह कोरोना व्हायरसचे सुद्धा संकट कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु गणेशोत्सवावर कोरोनाचे जरी सावट असले तरीही सण नागरिकांकडून साजरा करण्यात येत आहे.(Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थी निमित्त मुंबईच्या लालबागचा राजा गणपती मंडळात आरोग्य उत्सवाला सुरुवात; रक्त आणि प्लाझ्मा दान कॅम्पचे आयोजन)
दुसऱ्या बाजूला मोहरम सुद्धा अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत मिरवणुका सुद्धा काढण्यावर राज्य सरकाने बंदी घातली आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त एक आरएफची कंपनी, तीन एसआरपीएफ आणि लोकल आर्म्स आणि दंगल कंट्रोल पोलिसांचे पथक गणेशोत्साच्या दिवसात सुरक्षाव्यवस्थेच्या नियमानुसार आपले कर्तव्य बजावताना दिसून येणार आहेत. त्याचसोबत कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून, क्विक रिस्पॉन्स टी, बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड्स आणि अॅन्टी टेरेरिझम सेल्स सुद्धा कार्यरत असणार आहेत. तर स्थानिक पोलीस हे परिसरातील गणेश मंडळांच्या येथे सुरक्षाव्यवस्थेबद्दल पाहणार आहेत. त्याचसोबत अतिरिक्त पोलीसांमधील 30 कर्मचारी सुद्धा मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या येथे असणार आहेत.(मुंबई: गणेशोत्सवानिमित्त दादर मधील फुलमार्केट मध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी, पहा व्हिडिओ)
दरम्यान, शहरात गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर तब्बल 5 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. त्याचसोबत ड्रोनचा सुद्धा वापर केला जाणार आहे. भाजी मार्केट परिसरात सुद्धा सिव्हिल पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. सणाच्या वेळी नागरिकांनी गर्दी करण्याचे टाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच मंडळांनी सुद्धा ध्वनी प्रदुषण कमी होईल याकडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाव्यतिरिक्त मास्क घालावे आणि मंडपात निर्जंतुकीकरण करावे असे ही म्हटले आहे.