Riyaz Kazi Arrested by NIA: मुंबई पोलिस अधिकारी रियाज काझी यांना NIA कडून अटक; अँटिलीया प्रकरणात सचिन वाझेला केली होती मदत
एनआयएने रविवारी मुंबई पोलिस अधिकारी रियाज काझी यांना अटक केली आहे.
Riyaz Kazi Arrested by NIA: अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने (NIA) मोठी कारवाई केली आहे. अँटिलिया प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने रविवारी मुंबई पोलिस अधिकारी रियाज काझी यांना अटक केली आहे. एजन्सीने म्हटले आहे की, मुंबई पोलिस अधिकारी रियाजने सचिन वाझे यांना अँटिल्या प्रकरणातील कथानकात मदत केली होती. सध्या सचिन वाझे हे देखील एनआयएच्या ताब्यात आहेत.
सचिन वाझे यांच्याप्रमाणेच रियाज काझी हे देखील सहायक पोलिस निरीक्षक आहेत. अँन्टीलिया प्रकरण व्यतिरिक्त सचिन वाझे यांची मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू आहे. 5 मार्च रोजी मनसुखचा मृतदेह मुंबईत सापडला होता. 25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराजवळ उभी असलेली कार मनसुख हिरेन यांचीच होती. यानंतर सचिन वाझे यांना 13 मार्च रोजी अटक करण्यात आली. (वाचा - Anil Deshmukh CBI Enquiry: भ्रष्टाचार प्रकरणात CBI ची कारवाई सुरू; अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना समन्स)
दरम्यान, निलंबित मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना 23 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राष्ट्रीय चौकशी एजन्सीने सचिन वाझे यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. जेणेकरून त्यांची चौकशी होऊ शकेल. एजन्सीची ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान सचिन वाझेंच्या वकिलांनी त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची मागणी केली होती.
एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, “मुंबईतील उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्यानंतर सचिन वाझे एक मोठ्या कट रचण्याची योजना आखण्यात व्यस्त होता. प्रदीप शर्मा यांनी वाझे यांना मदत केली की, नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.