मुंबई: कलिना परिसरात एका महिलेवर थुंकून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वराला पकडण्यात पोलिसांना यश
यातच मुंबई (Mumbai) येथील कलिना (Kalina) परिसरात एका मणिपूर (Manipur) येथील महिलेवर थुंकून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वराला पोलिसांनी आज अटक केली आहे.
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. यातच मुंबई (Mumbai) येथील कलिना (Kalina) परिसरात एका मणिपूर (Manipur) येथील महिलेवर थुंकून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वराला पोलिसांनी आज अटक केली आहे. ही माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. ही घटना 6 एप्रिल रोजी घडली होती. यानंतर संपूर्ण शहरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. संबंधित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दाखल केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मदतीने आरोपीचा शोध घेत आज त्याला ताब्यात घेतले होते. तसेच संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे समजत आहे. सध्या जगभरात कोरोना या रोगाचे थैमान घातले आहे. हा विषाणू चीन देशातून इतरत्र पसरला आहे. त्यामुळे लोकांमध्ये चीनबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोनाच्या संसर्ग देशात झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे लोकांचे काम आणि त्यातून मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. याचा राग हा ओघाने कोरोना आलेल्या चीन देशावर काढला जात आहे. जागतिक स्तरावर देखील अनेक देशांनी या महामारीसाठी चीनला दोषी ठरवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अनेकदा हा चीनी व्हायरल असल्याचे जाहीर म्हटले आहे. हा व्हायरल पसरवण्यामागे चीनचे षडयंत्र असून त्याला सर्वात श्रीमंत देश बनायचे असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हटले जात आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात येत्या 20 एप्रिल पासून नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी 'या' गोष्टी सुरु करणार, सरकारचा निर्णय
एएनआयचे ट्विट-
दरम्यान, कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांनी समाजाचे भान ठेवून वागावे तर नागरिक एकमेकांवर थुंकत असल्याचे घाणेरडे प्रकार समोर येत आहेत. तसेच डॉक्टरांना आणि पोलिसांना मारहाण केल्याच्याही अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी असे गैरवर्तन किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.